वादाच्या भोवऱ्यात 'या' कलाकारांनी सोडली Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

Published by: Diksha Patil | Jul 26, 2023

तारक मेहता का उल्टा चष्मा

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

Published by: Diksha Patil | Jul 26, 2023

वादाच्या भोवऱ्यात

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तर काही कलाकारांनी मालिकाच सोडली.

Published by: Diksha Patil | Jul 26, 2023

मोनिका भदौरिया

मोनिका भदौरिया ही या मालिकेत बावरी ही भूमिका साकारत होती. तिनं तिचं मानधन वाढवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली होती, पण ती मागणी निर्मात्यांना मान्य नसल्यानं तिनं मालिका सोडली.

Published by: Diksha Patil | Jul 26, 2023

भव्य गांधी

सगळ्यांचा लाडका टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्या गांधीनं काही वर्षांपूर्वी मालिकेला रामराम केला. निर्मात्यांसोबत त्याचा कोणत्यागोष्टीवरून वाद झाला त्यामुळे त्यानं मालिका सोडल्याच्या चर्चा सुरु होत्या. तर असेही म्हटले जाते की निर्मात्यांनी भव्यला काढलं होतं.

Published by: Diksha Patil | Jul 26, 2023

नेहा मेहता

लॉकडाऊननंतर मालिकेचं शूटिंग सुरु झाल्यानंतर नेहा शूटिंगसाठी गेलीच नाही. तिनं मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. तर तिला तिचे पैसे मिळाले नाहीत याच विषयावर ती आजही निर्मात्याविषयी बोलताना दिसते.

Published by: Diksha Patil | Jul 26, 2023

शैलेश लोढा

शैलेश लोढा यांनी गेल्याच वर्षी मालिकेला रामराम केला. तेव्हापासून त्यांचा आणि निर्मात्यांमध्ये वाद सुरुच आहेत. शैलेश यांनी त्यांच्या मानधनासाठी निर्मांत्यांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल केला आहे.

Published by: Diksha Patil | Jul 26, 2023

जेनिफर मिस्त्री

रोशन भाभी ही गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत दिसत नाही आहे. मार्चमध्येच जेनिफरनं मालिका सोडली. आता तिनं दिलेल्या मुलाखतीत ही माहिती समोर आली आहे की निर्माते असित मोदी यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. तेव्हा पासून त्यांच्यात वाद हे सुरुच आहेत. (All Photo Credit : Respective Celebrity Instagram)

Published by: Diksha Patil | Jul 26, 2023

VIEW ALL

Read Next Story