'जहांगीर मांडलेकर, तुला...'; सुप्रिया पिळगावकरांची 'ती' Insta स्टोरी चर्चेत

Published by: Swapnil Ghangale | Apr 25, 2024

चिन्मय सध्या चर्चेत

मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चर्चेचं कारण म्हणजे त्याचा मुलगा.

Published by: Swapnil Ghangale | Apr 25, 2024

पत्नीनं उठवला आवाज

चिन्मयचा मुलगा जहांगीर याच्या नावामुळे सुरु असलेल्या ट्रोलिंगवरुन त्याच्या पत्नीने आवाज उठवल्यानंतर चिन्मयही याबाबतीत व्यक्त झाला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Apr 25, 2024

मुलाच्या नावावरुन टीका

मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय व त्याच्या कुटुंबियांना ट्रोल केलं जात आहे.

Published by: Swapnil Ghangale | Apr 25, 2024

चिन्मयच्या कुटुंबावर नको त्या कमेंट्स

चिन्मय आणि त्याच्या कुटुंबाला देश सोडून जाण्यापासून ते अगदी नको त्या भाषेत लक्ष्य केलं जात आहे ‘भारत सोडून जा’, ‘अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानात राहायला जा’, असे मेसेज ट्रोलर्सकडून अभिनेत्याला केले जात आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Apr 25, 2024

चिन्मचा मोठा निर्णय

ट्रोलिंगचा कुटुंबाला मानसिक त्रास होत आहे असं सांगताना या ट्रोलिंगला कंटाळून चिन्मय मांडलेकरनं एक मोठा निर्णय व्हिडीओ पोस्ट करत जाहीर केला.

Published by: Swapnil Ghangale | Apr 25, 2024

ही भूमिका कधीच साकारणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे घरोघरात पोहचलेल्या चिन्मयने यापुढे महाराजांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Apr 25, 2024

चिन्मयला कलाकारांचा पाठिंबा

चिन्मयच्या कुटुंबाबरोबर घडलेला प्रकार आणि त्याने घेतलेल्या या निर्णयानंतर काही मराठी कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Apr 25, 2024

सुप्रिया यांचाही पाठिंबा

यामध्ये आता ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांचाही समावेश झाला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Apr 25, 2024

वादावर झाल्या व्यक्त

सुप्रिया पिळगावकर चिन्मय मांडलेकरच्या मुलाच्या नावावरुन सुरु असलेल्या वादासंदर्भात सोशल मीडियावरुन व्यक्त झाल्या आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Apr 25, 2024

इन्स्टाग्रामवर पोस्ट केली स्टोरी

सुप्रिया पिळगावकर यांनी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत मोजक्या शब्दात आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Apr 25, 2024

काय म्हणाल्या आहेत सुप्रिया?

'जहांगिर मांडलेकर! तुला अनेकानेक शुभ आशीर्वाद!' असं वाक्य सुप्रिया पिळगावकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला पोस्ट केलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Apr 25, 2024

VIEW ALL

Read Next Story