'तुनूक तुनूक तून तारारा...'मध्ये एवढे सारे दिलेर मेहंदी का नाचताना दिसतात? यामागे एक रंजक कारण

आजचा दिवस दिलेर मेहंदीसाठी खास

पंजाबी पॉप गाण्यांचा ट्रेण्ड रुजवणाऱ्या काही आघाडीच्या पंजाबी गायकांपैकी एक म्हणजे दिलेर मेहंदी! याच गायकाचा आज म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे.

असा भारतीय सापडणं कठीण

गाणं आणि म्युझिकच्या वेडापायी वयाच्या 11 वर्षी घर सोडणाऱ्या दिलेर मेहंदींचं तुनूक तुनूक तून तारारा हे गाणं ऐकलं नाही असा भारतीय सापडणं तसं कठीणच!

वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करुन अनेक दिलेर मेहंदी

तुनूक तुनूक तून तारारा गाण्याच्या व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करुन दिलेर मेहंदींचेच ड्युप्लिकेट नाचत असल्याप्रमाणे पाहायला मिळतात. मात्र हा व्हिडीओ असा असण्यामागे एक खास कारण आहे.

ठराविक पद्धतीची टीका

दिलेर मेहंदी जेव्हा त्यांच्या उमेदीच्या काळात कामगिरीमुळे स्टेज गाजवत होता तेव्हा त्याच्यावर सातत्याने एका ठराविक पद्धतीची टीका होत होती.

काय दावा करण्यात आला?

दिलेर मेहंदीच्या गाण्यामध्ये महिला, तरुणी, पॉश गाड्या वगैरे दिसतात, व्हिडीओमध्ये आलिशान गोष्टी दाखवल्या जातात त्यामुळे गाणी चालतात आणि गाजतात असं टीकाकारांचं म्हणणं होतं. म्हणजेच यात दिलेरचं श्रेय फार कमी असल्याचा त्यांचा दावा होता.

आव्हान स्वीकारलं

हा दावा खोडून काढण्यासाठी दिलेर महेंदीने आव्हान स्वीकारलं आणि त्याने मी असं गाणं बनवेल की ते केवळ त्याच्या संगित आणि शब्दांसाठी गाजेल आणि सगळीकडे वाजेल असा प्रण घेतला.

शब्द खरा करुन दाखवला

यामधूनच तुनूक तुनूक तून तारारा गाण्याचा जन्म झाला आणि दिलेर मेहंदीने आपला शब्द खरा करुन दाखवला. या गाण्यात दिलेर मेहंदीच वेगवेगळ्या रंगाच्या पगडी आणि जॅकेट्स घालून नाचताना दिसतो.

गाणं प्रचंड गाजलं

तुनूक तुनूक तून तारारा हे गाणं प्रचंड गाजलं. आजही अनेक डिजे पार्ट्यांमध्ये दिलेर मेहंदीचं हे गाणं आवर्जून वाजवलं जातं.

VIEW ALL

Read Next Story