दीपिकाच्या 'या' शॉर्ट ड्रेसची किंमत 3-4 कार्सइतकी! SRK च्या बर्थडे पार्टीत केलेला परिधान; Price Tag पाहाच

अनेकदा असते चर्चेत

अभिनेत्री दीपिका पादुकोण ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

शाहरुखच्या वाढदिसवाच्या पार्टीला हजेरी

नुकतीच दीपिका किंग खान शाहरुखच्या वाढदिसवाच्या पार्टीमध्ये हजर होती.

'मन्नत' बंगल्यावर विशेष पार्टी

शाहरुखने 2 नोव्हेंबर रोजी 58 वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त 'मन्नत' बंगल्यावर विशेष पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला दीपिकाही हजर होती.

लूक चांगलाच व्हायरल

सोशल मीडियावर या पार्टीमध्ये दीपिकाने परिधान केलेल्या शॉर्ट ड्रेसमधील लूक चांगलाच व्हायरल झाला आहे.

थक्क करणारी किंमत

दीपिकाने या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिसणाऱ्या दीपिकाच्या शॉर्ट ड्रेसची किंमत ही सर्वसामन्यांना थक्क करणारी आहे.

कोणत्या ब्रॅण्डचा ड्रेस?

दीपिकाने परिधान केलेला हा करड्या रंगाचा आणि मरुन रंगांची डिझाइन असलेला ड्रेस ग्यूसिप डी मोराबितो ब्रॅण्डचा आहे.

डीप नेक ड्रेस

या मिनी ड्रेसवर गुलाबाच्या फुलांची झिझाइन होती. या ड्रेसचे आर्महोल फार मोठे होते आणि ड्रेस डीप नेक प्रकारचा होता.

या किंमतीत येईल एक SUV

दीपिकाने शाहरुखच्या बर्थ डे पार्टीमध्ये परिधान केलेला हा शॉर्ट ड्रेस 15 लाख 6 हजार 798 रुपयांचा आहे. एवढ्यात 3 ते 4 हॅचबॅक कार्स विकत घेता येतील.

शाहरुखबरोबर केलेला डेब्यू

दीपिका आणि शाहरुखने 'जवान' चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे. दीपिकाने 'ओम शांती ओम' या शाहरुखच्या चित्रपटातून पदार्पण केलेलं.

VIEW ALL

Read Next Story