मराठी चित्रपटसृष्टीतील या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
1913साली प्रदर्शित झालेला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला मराठी चित्रपट मानला जातो.मात्र काहींचे मत आहे की 1912ला प्रदर्शित झालेला 'श्री पुंडलिक' हा पहिला मराठी चित्रपट आहे
1988ला अशी ही बनवाबनवी हा 1करोड पार करणारा पहिला चित्रपट होता,नंतर 1992 साली माहेरची साडी या चित्रपटाने 10 करोडपेक्षा जास्त कमाई केली,नंतर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटने 25करोड,नटसम्राटने 50करोड,आणि सैराटने 100करोड पार केले.
आजकाल मराठी बिगबॉसमुळे चर्चेत असणाऱ्या वर्षा उसगावकरांना एकेकाळी मराठीतली श्री देवी म्हटले जायचे.त्यांना हे नाव गंमत जंमत या चित्रपटाच्या यशानंतर मिळाले होते.
1971 साली प्रदर्शित झालेला सोंगाड्या हा मराठीतला ब्लॉकबास्टर चित्रपट मानला जातो.त्याचप्रमाणे ,सोंगाड्या चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम कलाकृती मानला जातो.
महेश कोठारेंचा धुमधडाका हा चित्रपट बनवताना त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना 1 रुपया देऊन साईन केलं होतं. आणि लक्ष्मीकांतनी तो हसतहसत स्वीकारुन चित्रपटात काम करायला होकार दिला होता.