बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
अलीकडेच तिच्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा रंगल्या होत्या.
केवळ नातेसंबंधांमुळेच नाही, तर बच्चन कुटुंबासोबत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये न दिसल्यामुळेही ती चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर जया बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा यांनाही यावरून ट्रोल केलं जातं.
ऐश्वर्याच्या प्रेमकथा आजही चर्चेचा विषय असतात. सलमान खानसोबतचं तिचं नातं, त्यातील चढ-उतार सगळं अजूनही ट्रेंडमध्ये आहे.
मात्र, तुम्हाला माहित आहे का, सलमान खान हा ऐश्वर्याचं पहिलं प्रेम नव्हतं.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ऐश्वर्याचं नाव मॉडेल राजीव मुलचंदानीसोबत जोडलं गेलं होतं.
त्या काळात राजीव मुलचंदानी मनिषा कोइरालासोबत रिलेशनशिपमध्ये होता. असंही म्हटलं जातं की, राजीवने मनिषासाठी ऐश्वर्याशी असलेलं नातं तोडलं होतं.
मात्र, ऐश्वर्याने यावर स्पष्टपणे सांगितलं होतं की ती आणि राजीव फक्त चांगले मित्र होते. त्यांच्या मैत्रीच्या पलीकडे काहीच नव्हतं.
एका मुलाखतीत ऐश्वर्याने राजीव-मनिषाच्या नात्याबद्दलचं सत्यही सांगितलं. मात्र, दुसरीकडे मनिषा कोइरालाने ऐश्वर्यावर अनेक आरोप केले होते.