बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या आपल्या 'रेड 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षकांना त्याचा हा चित्रपट प्रचंड आवडला.
रिलीजच्या पहिल्याच दिवशी त्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. सध्या देखील चित्रपटाची कमाई सुरू आहे.
'रेड 2' नंतर अजय देवगण अनेक नव्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. त्यात सर्वाधिक चर्चा आहे ती 'दृश्यम' चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची.
या लोकप्रिय थ्रिलरचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दृश्यम 3' ची रिलीज डेटही नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. 'दृश्यम' फ्रँचायझीमध्ये 2 तारखेला एक वेगळे महत्त्व असल्याने ही तारीख खास मानली जात आहे.
फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली. जरी त्यांनी थेट चित्रपटाचं नाव घेतलेलं नसलं, तरी त्यांच्या पोस्टमधून तो 'दृश्यम 3' असणार यावर चाहत्यांचा पूर्ण विश्वास आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक करणार आहेत, तर निर्मिती Viacom18 Studios आणि Panorama Studios करत आहेत.
'दृश्यम' चित्रपटातील आधीचे दोन्ही भाग सुपरहिट ठरले असून, त्यामुळे प्रेक्षक 'दृश्यम 3' साठी खूपच उत्सुक आहेत.