बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'किंग' मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाबाबत दररोज काही ना काही नवे अपडेट्स समोर येत आहेत.
अलीकडेच वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये एका भव्य अॅक्शन सीक्वेन्सचं शूटिंग करण्यात आलं.
या अॅक्शन सीनसाठी 3 आंतरराष्ट्रीय स्टंट तज्ज्ञांना खास बोलावण्यात आलं होतं. हा धमाकेदार सीन 15 जून रोजी 200 स्टंटमनसोबत शूट करण्यात आला.
आता 'किंग' चित्रपटाबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. जगप्रसिद्ध पॉप सिंगर ed sheeran या चित्रपटात एक गाणं गाणार असल्याचं समोर आलं आहे.
सोशल मीडियावर एड शीरनने एका कमेंटमध्ये याची माहिती दिली आहे आणि यामुळे त्याच्यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.
इन्स्टाग्रामवर ed sheeranने एका नेटकऱ्याच्या कमेंटला उत्तर देताना सांगितलं की, त्याने शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटासाठी एक हिंदी गाणं रेकॉर्ड केलं आहे.
हे गाणं 'सैफायर' नावाच्या गाण्याच्या पंजाबी व्हर्जनवर आधारित असून त्यात अरिजीत सिंग देखील सहभागी असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.
शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही एक खास आनंदाची बातमी ठरत आहे. इडी शीरन आणि अरिजीत सिंग सारखे दोन आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार एकत्र येत असल्यामुळे हे गाणं खास ठरणार, याची खात्री आहे.
अलीकडेच एड शीरन भारतात आला होता आणि त्याने त्याच्या सोशल मीडियावर काही खास क्षण शेअर करत आपल्या भारत भेटीची आठवण जपली.
आता 'किंग' चित्रपटामुळे त्याचा आणि बॉलिवूडचा हा अनोखा संगम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.