69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट सृष्टीत हा मानाचा पुरस्कार मानला जातो.

यंदो दोन अभिनेत्रींना बेस्ट एक्ट्रेसचा पुरस्कार जाहीर झाला आहे.आलिया भट्टला गंगूबाई कोठियावाडीसाठी तर कृति सेननला मिमी चित्रपटातील भूमिकेसाठी पुरस्कार जाहीर झालाय.

आलिया भट्ट आणि कृती सेननला पुरस्कार विभागून देण्यात आला असला तरी पुरस्काराची संपूर्ण रक्कम त्यांना वेगवेगळी मिळणार आहे. दोघींनाही पुरस्कार आणि प्रत्येक 50 हजार रुपयांचं मानधन दिलं जाईल.

सपोर्टिंग रोलसाठी काश्मिर फाईल्स चित्रपटातील पल्लवी जोशीला बेस्ट फिमेल एक्ट्रेसचा पुरस्कार जाहीर झालाय. पल्लवी जोशीलाही पुरस्कार आणि 50 हजार रुपयांची धनराशी मिळेल.

बेस्ट अॅक्टर पुरस्कारासाठी पुष्पा फेम अल्लू अर्जुनने यावेळी बाजी मारली आहे. दक्षिणेच्या या अभिनेत्याला राष्ट्रीय पुरस्कार आणि 50 हजार रुपये मिळतील.

बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरसाठी पंकज त्रिपाठी यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मिमी या चित्रपटासाठी हा सन्मान करण्यात आला आहे. त्यांना पुरस्कार आणि 50 हजारांचं मानधन मिळेल.

बेस्ट चित्रपटांच्या यादीत यावेळी रॉकेट्री : द नंबी एफेक्ट या चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाला पुरस्कार आणि 2,50,000 रुपयांची राशी दिली जाईल. हा चित्रपट आर माधवन यांनी दिग्दर्शित केलाय.

बेस्ट दिग्ददर्शनासाठी गोदावरी या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल महाजनने केलं आहे. पुरस्कार आणि 2,50,000 मानधन या चित्रपटाला मिळेल.

VIEW ALL

Read Next Story