रिअल लाईफमध्ये खूपच ग्लॅमरस आहे, 'मिर्झापूर'ची माधुरी भाभी

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या 'मिर्झापूर 3'ची चांगलीच चर्चा रंगली आहे. पहिल्या दोन हंगामाच्या यशानंतर तिसरा हंगाम प्रदिर्शित झालाय.

'मिर्झापूर 3' मध्ये मुख्यमंत्री अर्थात अर्थात माधुरी भाभीने आपल्या भूमिकेने प्रेक्षकांवर चांगलीच भूरळ पाडलीय. माधुरी भाभीची भूमिका अभिनेत्री ईशा तलवारने साकारलीय.

रिल लाईफमध्ये माधुरी भाभी अर्थात ईशा तलवारने सोज्वळ भूमिका साकारली आहे. पण रिअल लाईफमध्ये ती खूपच ग्लॅमरस आहे.

ईशा तलवार हिंदी इंडस्ट्रीतली एक स्टायलिश अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि बिंधास्त वागण्यामुळे ती चर्चेत असते.

ईशा तलावर सोशल मीडिआवर चांगलीच सक्रीय आहे. इंस्टाग्रामवर तिचे 1 मिलिअनहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या अकाऊंटवर ती बोल्ड फोटो शेअर करत असते.

मिर्झापूर 2 मध्येही ईशा तलवार दिसली होती. पण यानंतरही तिला मोठ्या भूमिका मिळाल्या नाहीत, एक वर्ष तिला घरी बसूनच काढावी लागली.

एका वर्षानंतर तिला सास बहू और फ्लेमिंगो मालिकेची ऑफर आली. आता मिर्झापूर 3 मधल्या भूमिकेमुळे तिने पुन्हा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

VIEW ALL

Read Next Story