डॉन न्यूजच्या एका मुलाखतीत अली खानला जॉन अब्राहमबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. जॉन खरच टॅलेंटेड आहे की त्याच्या फिटनेसमुळे त्याला फायदा होतो असा प्रश्न विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना जॉनकडे टॅलेंट नसतं तर तो इतकी वर्ष बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये टिकला नसता असं अली खानने म्हटलं.

जॉन अब्राहनच्या फिटनेसचं रहस्य त्याच्या आहार आणि शिस्तीत दडल्याचं अली खानने म्हटलंय. बॉलिवूडमधल्या त्याच्या यशाचं हे यश असल्याचंही त्याने सांगितलं.

वयाच्या 51 वर्षीही जॉन अब्राहमची पिळदार शरीरयष्टी आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेली 25 वर्ष त्याने साखरेचा कणही खालेला नाही.

जॉन अब्राहम केवळ शुगर फ्री पदार्थ खातो. इतकंच काय तर जॉनने आयुष्यात कधी दारू किंवा सिगारेटलाही हात लावलेला नाही.

एका भेटीत अली खानने जॉनला विचारलं मांस आणि प्रोटीन खाऊन तू पिळदार शरीरयष्टी बनवलीस का? यावर जॉनने आपण शाकाहारी असल्याचं सांगितलं होतं.

काही वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टीच्या टॉक शोमध्ये जॉनने आपल्या फिटनेसचं रहस्य सांगितलं होतं. चांगला डाएट खूप महत्त्वाचा असल्याचं त्याने सांगितलं होतं.

यासाठी जॉन अब्राहमने तीन टीप्स दिल्या होत्या. चांगला डाएट, चांगला व्यायाम आणि चांगली झोप आयुष्यात महत्त्वाचं असल्याचं त्याने सांगितलं.

VIEW ALL

Read Next Story