बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या वेबसीरिज हिरामंडीमुळे चांगलीच चर्चेत आहे. त्याचबरोबर सध्या तिच्या लग्नाचा चर्चांनीही वेग पकडला आहे.

सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जातंय. पण स्वत: सोनाक्षीकडून मात्र याबात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

पण सोनाक्षी आपला कथित बॉयफ्रेंड आणि अभिनेता जहीर इक्बालबरोबर लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक काळापासून हे दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत.

सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नावरुन चाहत्यांचे दोन मतप्रवाह आहेत. काही चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर काही चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. सोनाक्षी सिन्हा मुंबईत राहाते, जुहूमध्ये तिचं 10 मजली घर असून या निवासस्थानाचं नाव 'रामायण' आहे.

सोनाक्षीला दोन भाऊ असून त्यांची नावं लव आणि कुश अशी आहेत. सोनाक्षीचे दोन्ही भाऊ लाईमलाईटपासून दूर असतात.

सोनाक्षी ही अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असून शत्रुघ्न सिन्हा यांना तीन भाऊ आहेत. त्यांची नावं राम सिन्हा, लक्ष्मण सिन्हा आणि भरत सिन्हा अशी आहेत.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सोनाक्षी आणि जहीर गेल्या काही काळापासून लग्नाची प्लाईंग करत आहेत आणि दोघांच्या कुटुंबाकडून लग्नाला परवानगी देण्यात आलीय.

VIEW ALL

Read Next Story