धूम, धूम2, धूम3 जबरदस्त यशानंतर नंतर आता धूम4 चार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल.

user
user Jan 11,2024


धूम या चित्रपटात अभिषेक बच्चने प्रमुख भूमिका साकारली होती. तर धूम2 चित्रपटात ऋतीक रोशन आणि धूम3 मध्ये आमिर खानने काम केलं.


आता धूम4 मध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खान प्रमुख अभिनेता असणार अशी चर्चा सुरु झाली आहे.


शाहरुख खाननेही धूम4 चित्रपटसाठी होकार दिल्याची चर्चा आहे. पण अधिकृतरित्या याची कोणतीही घोषणा झालेली नाही


2023 हे वर्ष शाहरुख खानने गाजवलं. जवान आणि डंकी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.


याआधी शाहरुखच्या पठाण चित्रपटानेही बॉक्स ऑफिसर छप्परफाड कमाई केली. हे तीनही चित्रपट सुपर-डुपर हिट ठरले


पठाण, जवान आणि डंकीच्या यशानंतर शाहरुख खानचं नाव अनेक चित्रपटांबरोबर जोडलं जात आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार 2024 मध्ये शाहरुख एकही चित्रपट करणार नाही.

VIEW ALL

Read Next Story