या वर्षात टायगर श्रॉफ मोठा धमाका करायला सज्ज झाला आहे. दोन मोठे अॅक्शन चित्रपट घेऊन तो येतोय. यातला पहिला चित्रपट आहे गणपथ. विकास बहल यांच्या या चित्रपटाचं शुटिंग जवळपास पूर्ण होत आलं असून 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
2023 मध्ये शाहरुख खान बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणण्याच्याच इराद्याने उतरणार आहे. पठाण आणि जवाननंतर शाहरुख राजकुमार हिरानी यांच्या डंकी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सोशल कॉमेडीव थीमवर आधारीत असून 22 डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटाचं बजेट 100 कोटी रुपये इतकं आहे.
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ ज्या चित्रपटात आहेत, अर्थात तो चित्रपट अॅक्शनने भरलेला असणार हे आलंच. बड़े मियां छोटे मियां या चित्रपटाचं बजेटही तितकंट तगडं आहे. या चित्रपटावर 300 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या चित्रपटाची तारीख 22 नोव्हेंबर ठरवण्यात आली आहे.
ईदनंतर दिवाळीच्या मुहूर्तावर दंबगाई दाखवण्यासाठी सलमान खान सज्ज आहे. 10 नोव्हेंबरला सलमान आपल्या टायगर 3 या चित्रपटासह झळकणार आहे. या चित्रपटात कतरीना कैफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं बजेट साधारणत: 200 कोटी रुपये इतकं आहे.
रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा एनिमल हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. कबीर सिंह बनवणारे संदी रेड्डी वांगा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाचा बजेट 120 कोटी इतका आहे.
कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असलेला सत्य प्रेम की कथा हा चित्रपटा म्युझिकल चित्रपट असल्याची माहिती आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी अभिनेत्री असून हा चित्रपट 29 जूनला प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटाचं बजेट 50 ते 60 कोटी रुपये इतकं आहे.
प्रभास, सैफ अली खान आणि कृती सेनेन यांची प्रमुख भूमिका असलेला आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादग्रस्त ठरला आहे. या वर्षातला हा सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट आहे. या चित्रपटावर तब्बल 500 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. 16 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
तामिळ चित्रपटसृष्टीतील डिरेटक्टर एटलीबरोबर शाहरुख खानचा जवान हा चित्रपटा येत्या 2 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा सारखे कलाकार आहेत. जवान या चित्रपटाचं बजेट 200 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे.