पुन्हा किंग खान! जवान, डंकी आणि...शाहरुखच्या 'या' चित्रपटांचा डंका वाजणार

Published by: Zee Team | Aug 30, 2023

'पठाण' चित्रपटाने देशातच नाही तर परदेशातही तुफान कमाई केली. बॉक्स ऑफिसवर 'पठाण' चित्रपटाने जवळपास हजार कोटी रुपयांचा गल्ला जमावला.

Published by: Zee Team | Aug 30, 2023

2023 प्रमाणेच 2024 मध्येही शाहरुख खानचा धडाका पाहिला मिळणार आहे. आपल्या चाहत्यांसाठी शाहरुख एकाहून एक हिट चित्रपट घेऊन येणार आहे.

Published by: Zee Team | Aug 30, 2023

शाहरुख खानाच बहुचर्चित 'जवान' हा चित्रपट येत्या 7 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात किंग खानचा डबल रोल पाहिला मिळणार आहे.

Published by: Zee Team | Aug 30, 2023

'जवान' चित्रपटाचं गाणंही प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला करोडोने व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली असून चित्रपटाचं तिकिट बुकिंग फुल झालं आहे.

Published by: Zee Team | Aug 30, 2023

'जवान' चित्रपटानंतर शाहरुख खान 'डंकी' चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'डंकी' हा चित्रपट याचवर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू अभिनेत्री आहे.

Published by: Zee Team | Aug 30, 2023

याशिवाय सलमान खानच्या मोस्ट अवेटेड 'टायगर-3' चित्रपटातही शाहरुख खान दिसणार आहे. हा चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Published by: Zee Team | Aug 30, 2023

मीडिया रिपोर्टनुसार तब्बल सतरा वर्षांनंतर शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसणार आहेत. एका प्रोजेक्टसाठी दोघं काम करत आहेत. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Published by: Zee Team | Aug 30, 2023

तसंच दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या Operation Khukri या चित्रपटातही शाहरुख खान दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Published by: Zee Team | Aug 30, 2023

2023 वर्षात शाहरुख खान पठाण, जवान आणि टायगर-3 अशा तीन चित्रपटात दिसणार आहे. पण त्याचबरोबर 2024 मध्येही शाहरुखच्याच चित्रपटांचा धडाका असणार हे निश्चित

Published by: Zee Team | Aug 30, 2023

VIEW ALL

Read Next Story