विरोध करायला सुरुवात केल्यावर मला शोमधून काढून टाकण्याची नोटीस आली. त्यामुळे आता मागे हटणार नसल्याचं जेनिफरने सांगितलं.
गेली पंधरा वर्ष त्यांनी मला खूप भीती घातली होती. पण आता सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याने हे कृत्य समोर आणल्याचं जेनिफर म्हणते.
तारक मेहताचे निर्माते असित मोदींविरोधात कायदेशीर पावलं उचलणार असल्याचं जेनिफरने म्हटलं आहे.
जेनिफरने असित मोदींवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. अनेकवेळा असित मोदींनी तिच्याकडे Kiss मागितल्याचं तिचं म्हणणं आहे.
जेनिफरने निर्माते असित मोदीवर गंभीर आरोप केले आहेत. असित मोदी फ्लर्ट करायचे, रात्री रुममध्ये येण्यासाठी जबरदस्ती करायचे असा आरोप जेनिफरने केलाय.
तारक मेहताच्या सुरुवातीपासून म्हणजे गेली 15 वर्ष जेनिफर या कार्यक्रमाशी जोडली गेलीय. पण आता तीने शो सोडण्याचा निर्णय घेतलाय.
छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा कार्यक्रमातील रोशन सोढीची भूमिका साकारणारी जेनिफर बंसीवाल सध्या चर्चेत आहे