छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम तारक मेहता का उल्टा चष्मामधील सोनू भिडेची भूमिका करणारी सोनू भिडे अर्था झील मेहता लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

झील सध्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. यादरम्यान तिचा होणारा पती आदित्य दुबेसोबत तीने फोटोशूट केलं

झीलने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती एका समुद्र किनाऱ्यावर रोमँटिक अंदाजात आदित्यला प्रपोज करताना दिसत आहे.

एका गुडघ्यावर बसून झीलने आदित्यला प्रपोज केलं. यात ती आदित्यच्या बोटात डायमंड रिंग घालताना दिसतेय.

झीलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून चाहत्यांच्या पसंतीस पडतोय.

झील मेहतानं एक चाइल्ड आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली. तिचा पहिला शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' होता. तेव्हा झील ही फक्त 9 वर्षांची होती.

पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी झीलनं तारक मेहता मालिका सोडली. आता झील मेहता मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. झील तिच्या आईसोबत या प्रोफेशनमध्ये आहे.

VIEW ALL

Read Next Story