इंडियन क्रिकेटर दिनेश कार्तिकने याचं उत्तर दिलं आहे. Cricbuzz ला दिलेल्या मुलाखतीत दिनेश कार्तिकने टीम इंडियातल्या काही खेळाडूंवर बायोपिक बनवण्याचा सल्ला दिला.
विराट कोहलीवर बायोपिक बनला तर अभिनेता रणबीर कपूर या भूमिकेसाठी योग्य असल्याचं कार्तिकने म्हटलंय. विराटची प्लेईंग स्ट्राईल कॅप्चर करण्याची क्षमता रणबीरमध्ये असल्याचं त्याने म्हटलंय.
रोहित शर्माच्या कारकिर्दीवर बायोपिक झाला तर दाक्षिणात्या स्टार विजय सेतुपती बेस्ट असल्याचं कार्तिकने म्हटलंय. गमतीशर आणि गंभीर दोन्ही भूमिका तो साकारू शकतो.