बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानने चित्रपट 'छोरी 2' मधून कमबॅक केला आहे. या चित्रपटात तिने 'दासी मा' ही भूमिका साकारली आहे.
'छोरी 2' या भयपटात सोहाने प्रभावी अभिनय केला आहे. तिच्या कामगिरीचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
चित्रपटात तिने एका गूढ आणि भयावह स्त्रीची भूमिका साकारली आहे.
सोहा अली खानने नुकतेच चित्रपटाच्या सेटवरील काही BTS फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा भीषण लूक पाहून चाहते अक्षरश: थक्क झाले आहेत.
तिने साकारलेला हा लूक इतका भयानक आहे की काहीजण तिला ओळखूही शकत नाहीत. तिचा हा चेहरा चेटकीण किंवा गूढ शक्ती असलेल्या पात्रासारखा भासत आहे.
सोहाच्या या फोटोंवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिक्रिया मिळत आहेत. एका युजरने कमेंट केली, 'मला खरंच भीती वाटली', तर दुसऱ्याने लिहिलं, 'खूपच भयंकर आहे!'
सोहाचा हा भयानक लूक पाहून चाहते चकित झाले आहेत आणि तिने साकारलेल्या भूमिकेबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत.
सोहा अली खान शेवटची 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'साहेब, बीवी और गँगस्टर 3' या चित्रपटात दिसली होती.