फराह खानचा कुक दिलीप पहिल्यांदाच इंटरनॅशनल ट्रिपवर; विमानतळावर वाटली मिठाई!

Published by: Zee Team | Jun 05, 2025

कोरिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खान आपल्या यूट्यूब चॅनलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या व्हिडिओंमध्ये ती तिचा खास स्वयंपाकी दिलीपसोबत धमाल मस्ती करताना दिसते.

Published by: Zee Team | Jun 05, 2025

फराहची आणि दिलीपची मजेशीर केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. गेल्या काही महिन्यांत दिलीपची लोकप्रियता लक्षणीयरित्या वाढली आहे आणि यामुळेच तो प्रचंड आनंदी आहे.

Published by: Zee Team | Jun 05, 2025

आता त्याच्या आयुष्यात आणखी एक खास क्षण आला आहे. दिलीप पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सहलीला रवाना झाला आहे.

Published by: Zee Team | Jun 05, 2025

अलिकडेच दिलीप फराह खानसोबत मुंबई विमानतळावर दिसला. तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी त्याला आपल्या कॅमेऱ्यात टिपलं.

Published by: Zee Team | Jun 05, 2025

दिलीपच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि त्याने फराहसोबत पापाराझींना मिठाई वाटली. त्यावेळी त्याची नेहमीची मजेशीर स्टाईलही दिसून आली.

Published by: Zee Team | Jun 05, 2025

फराह आणि दिलीप यांचे हे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. चाहते त्यावर कौतुकाचे आणि प्रेमाने भरलेले कमेंट्स करत आहेत.

Published by: Zee Team | Jun 05, 2025

फराह खानच्या साध्या आणि गोड वागणुकीने अनेक नेटकरी भारावून गेले आहेत. काहींनी कमेंट करत लिहिलं, 'फराहने खरंच दिलीपला रस्त्यावरून उचलून स्टार बनवलं आहे.'

Published by: Zee Team | Jun 05, 2025

तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने मजेशीर पद्धतीने लिहिलं, 'आता आपल्यालाही फराह खानसारखी व्यक्ती शोधावी लागेल, तेव्हाच इंटरनॅशनल ट्रिप शक्य होईल.'

Published by: Zee Team | Jun 05, 2025

फराह खानचे यूट्यूब चॅनल अल्पावधीतच लोकप्रिय झाले असून, तिला एका वर्षात 10 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स मिळाले आहेत.

Published by: Zee Team | Jun 05, 2025

तिच्या चॅनलवर अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी येतात आणि मजेशीर किस्से शेअर करत विविध चविष्ट पदार्थ बनवतात.

Published by: Zee Team | Jun 05, 2025

VIEW ALL

Read Next Story