सध्या सर्वत्र धामधूम आहे ती म्हणजे गणेश चर्तुथीची. लवकरच गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे आता सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे गणरायाचीच.

Sep 16,2023


तुमच्याही घरी गणपतीचे आगमन होणार असेलच, तेव्हा तुम्हीही गणपती बाप्पाच्या आगमनासाठी व्यस्त असाल. परंतु थोडासा वेळ काढा आणि पुण्यातील या पाच मानाच्या गणपतींविषयी नक्की जाणून घ्या. त्यांच्या रंजक इतिहास हा प्रचंड अभिनास्पद आहे.


अगदी पेशव्यांच्या आधीपासून या गणपतींचा इतिहास आहे. पुण्यातील या पाचही मानाच्या गणपतींचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे.

श्री कसबा गणपती

पहिल्या मानाच्या गणपतीबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि ते म्हणजे श्री कसबा गणपती. लालमहाल बांधला त्यावेळी जिजाऊंनी या मूर्तीची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापुर्वी या गणपतीचे दर्शन घेऊन जात. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893 पासून सुरूवात झाली. याच गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणूकीला सुरूवात होते.

श्री गुरुजी तालीम गणपती

श्री गुरुजी तालीम गणपती हा पुण्यातील मानाचा तिसरा गणपती. सुरूवातीला हा गणपती तालमीत बसवला जायचा. या गणेशोत्सवाला 1887 मध्ये सुरूवात झाली.

श्री तुळशीबाग गणपती

दक्षित तुळशीबागवाले यांनी 1900 साली या गणेशोत्सवाची स्थापना केली. हा पुण्यातील मानाचा चौथा गणपती आहे.

श्री तांबडी जोगेश्वरी गणपती

श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान आहे. याची सुरूवातही 1893 साली झाली. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते.

श्री केसरीवाडा गणपती

पुण्यातील पाचवा मानाचा गणपती म्हणजे श्री केसरीवाडा गणपती. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव 1894 पासून सुरू झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. मग 1905 पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते.

VIEW ALL

Read Next Story