बॉलिवूडचा किंग शाहरुख खानप्रमाणे त्याची पत्नी गौरी खानही कायमच चर्चेत असते. गौरी ही प्रसिद्ध इंटेरिअर डिझाईनर आहे.

Feb 28,2024


गौरीने आपल्या कौशल्याच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी गौरीने मुंबईत स्वत:चे रेस्टॉरंट सुरु केले.


गौरीने नुकतंच एक मुलाखत दिली. यात तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले.


"आमच्या घरी सर्व उशीरा झोपतात. त्यामुळेच माझी सकाळ ही 10 नंतरच होते", असे गौरीने यावेळी म्हटले.


"मी सकाळी कॉफी प्यायल्यानंतर जिमला जाते. पण मी नियमित दुपारचे जेवण मुलांसोबतच करते", असे गौरी म्हणाली.


"माझ्यासाठी माझी तिनही मुलं ही प्राथमिकता आहेत. शाहरुख खानला रात्री जागरण करायला आवडते. तो अनेकदा रात्री जागा राहतो", असेही गौरी म्हणाली.


"मला सुरुवातीला मुंबई आवडत नव्हती. पण शाहरुख सुपरस्टार झाल्यानंतर मी मुंबई शहराच्या प्रेमात पडले", असाही खुलासा गौरीने केला.


शाहरुख व गौरी खान या दोघांना बॉलिवूडमधील आदर्श जोडी म्हणून ओळखलं जातं. या दोघांनी ऑक्टोबर १९९१ मध्ये लग्नगाठ बांधली होती.

VIEW ALL

Read Next Story