प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) च्या वडिलांचं निधन झालं आहे.
गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात (Dhule) बेवारस आणि खंगलेल्या अवस्थेत आढळून आले होते.
ही बातमी गौतमीपर्यंत पोहोचल्यानंतर तिने वडिलांना मदत करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते.
4 सप्टेंबर 2023 रोजी गौतमीचे वडील रवींद्र बाबूराव पाटील यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर कालच अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला गौतमी आणि तिची आई उपस्थित होते.
गौतमी ही लहानपणापासूनच तिच्या मामांकडे वाढली आहे. मात्र वडील म्हणून रवींद्र पाटील यांनी कोणतेही कर्तव्य बजावलेले नाही असं सांगितलं जातं.
आयुष्यभर दूर राहिलेल्या जन्मदात्याला अखेरचा निरोप देताना मात्र गौतमीचे डोळे पाणावले. गौतमीने मुलगी म्हणून अंत्यसंस्काराचे सर्व विधी केले.
गौतमीच्या वडिलांच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर निकामी झाल्या होत्या. ते बेवारस सापडले तेव्हा 2 दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता.
रवींद्र पाटील यांना दारूचं व्यसन होतं. त्यामुळे गौतमीची आई गौतमीला पुण्यात घेऊन आली आणि गौतमीने इथेच नृत्याचे धडे घेतले.
उपचारानंतर वडिलांना व्यसनमुक्ती केंद्रात ठेवण्याचा गौतमीचा विचार होता. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.