रितेशच्या 'त्या' मेसेजनंतर जिनिलीया रात्रभर झोपली नाही, अभिनेत्रीने केला खुलासा


बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध चर्चेत असणारे कपल म्हणजे जिनिलीया आणि रितेश.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला आहे.


खरं तर, जिनिलीया आणि रितेश एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर रितेशने जिनिलीयासोबत प्रँक केला होता.


रितेशने जिनिलीयाला प्रँक करताना एक मेसेज पाठवला होती की, आता आमचे नाते संपले आहे.


त्यावेळी जिनिलीयाने सांगितले की, मी लवकर झोपायचे आणि तो खूप उशिरा झोपायचा. त्यांनी मला रात्री 1 वाजता मेसेज केला आणि झोपायला गेला.


मी रात्री 2.30 वाजता तो मेसेज वाचला. त्यावेळी माझी अवस्था डिप्रेशनमध्ये गेल्यासारखी झाली होती.


त्यावेळी मी रात्रभर झोपले नव्हते. सकाळी 9 वाजेपर्यंत मी जागीच होते. रितेश विसरला होता की त्याने प्रँक केला होता.


नंतर रितेशने फोन केला असता मी त्याच्याशी बोलले नाही आणि फोन कट केला. मात्र, रितेशने एप्रिल फूलच्या दिवशी हा प्रँक केला होता.

VIEW ALL

Read Next Story