बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आज त्याचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे.
नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त जिनीलियाने एक खास रोमँटिक इन्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
जिनीलियाने रितेशसोबतचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केलाय.
हॅपी बर्थडे नवरा या मथळ्याखाली जिनीलियाने भावना व्यक्त केल्या आहेत.
रितेश देशमुख कोण आहे??? मी एवढेच म्हणेन की...
संपूर्ण जगातील सर्वात ग्रेट माणूस आणि हा ग्रेट व्यक्ती माझा आहे, असं जिनीलियाने म्हटलं आहे.
दरम्यान, जवळपास 8 वर्ष डेट केल्यावर या दोघांनी 2 फेब्रुवारी 2012 मध्ये लग्न केलं होतं. रियान आणि राहील अशी दोन मुलं त्यांना आहेत.