कालपरवाच्या अभिनेत्याला सलमानचा फोन; नंतर बघतो म्हणत त्यानं केलं Ignore, पाहा 'तो' आहे तरी कोण

Published by: Zee Team | Jul 10, 2023

फोननं संपर्क साधला

हिंदी चित्रपट सृष्टीत अनेकांचाच गॉडफादर, किंवा अनेक नवोदितांना ब्रेक देण्यासाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सलमान खान यानं या नव्यानं प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्याला फोननं संपर्क साधला.

Published by: Zee Team | Jul 10, 2023

'किसी का भाई, किसी की जान'

'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटाच्या निमित्तानं सलमाननं ज्याच्याशी संपर्क साधला, त्या अभिनेत्याचं नाव राघव जुयाल.

Published by: Zee Team | Jul 10, 2023

रिअॅलिटी शोमुळं प्रसिद्धीझोतात

एका रिअॅलिटी शोमुळं प्रसिद्धीझोतात आलेल्या आणि पाहता पाहता अभिनेता, डान्सर अशा विविध कारणांनी ओळख बनवणाऱ्या राघवनं मात्र त्याचा फोनकॉल घेणं टाळलं.

Published by: Zee Team | Jul 10, 2023

बोलणं टाळलं

'त्याला सांग नंतर फोन करतो', असं म्हणत राघवनं सलमानशी बोलणं टाळलं. पण, इथं त्याची मोठी चूक झाली.

Published by: Zee Team | Jul 10, 2023

सहकारी सलमान

राघवला हा फोन सलमान खानचा आहे, हे लक्षातच आलं नाही. आपला सहकारी सलमान युसूफ खान याचा फोन आहे, असंच त्याला वाटलं आणि त्यानं हे उत्तर दिलं.

Published by: Zee Team | Jul 10, 2023

भाईजान

भाईजान सलमान खाननं फोन केल्याचं कळताच त्याला धक्का बसला.

Published by: Zee Team | Jul 10, 2023

ही बाब पचवणं कठीण

खुद्द सलमान खान आपल्याशी संपर्क साधेल याचा विचारही राघवनं केला नव्हता. त्यामुळं त्याच्यासाठी ही बाब पचवणं कठीण होतं.

Published by: Zee Team | Jul 10, 2023

नशिब पालटलं

या फोननं त्याचं नशिब पालटलं. खुद्द सलमाननं आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी म्हणून राघवशी संपर्क साधला होता.

Published by: Zee Team | Jul 10, 2023

दबंग खान

इथूनच त्याचं आणि दबंग खाननं मैत्रीचं नातंही आकारास आलं. (सर्व छायाचित्र- राघव जुयाल/ इन्स्टाग्राम)

Published by: Zee Team | Jul 10, 2023

VIEW ALL

Read Next Story