बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
अभिनेत्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, यामध्ये सर्वात जास्त फ्लॉप चित्रपटांचा समावेश आहे.
पण सध्या अभिषेक बच्चन घरबसल्या महिन्याला 18.9 लाख रुपयांची कमाई कशी करतो हे जाणून घेणार आहोत.
अभिषेक बच्चनने त्याचा जुहू येथील बंगल्याचा तळमजला SBI ला 15 वर्षांच्या करारावर दिला आहे.
या करारातून अभिषेकला दरमहिन्याला 18.9 लाख रुपये निश्चित उत्पन्न मिळते.
अभिनेत्याचा हा निर्णय एक हुशार व्यावसायिक म्हणून पाहिला जातो. कारण यामधून त्याला स्थिर उत्पन्न मिळते.
अभिषेकला या करारातून आपल्या रिअल इस्टेट गुंतवणुकीचा एक भाग म्हणून चांगला नफा मिळवला आहे.