शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने तिचं शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी अंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये पूर्ण केलं आहे. तिची भावंडही याच शाळेत शिकली आहेत.
धीरूभाई अंबानी अंतरराष्ट्रीय स्कूलची एका वर्षाची फी 7 ते 10 लाख रुपये इतकी आहे.
सुहाना उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली होती. सुहाने अनेक वर्ष तिथे होती.
सुहानाने आर्डिंगली कॉलेजच्या बोर्डिंग स्कूलमध्ये उच्च शिक्षण घेतलं.
तेथील एका सेमिस्टरची फी 14 हजार पाऊंड इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार 14 लाख 78 हजार रुपये इतकी आहे.
सुहानाने 2019 साली अमेरिकेतील टिश स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला.
अमेरिकेत सुहानाने शिक्षण घेतलेल्या कॉलेजची एका वर्षाची फी 5 हजार डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 4 लाख 15 हजार रुपये इतकी होती.
सुहानाच्या अमेरिकेतील कॉलेजची दुसऱ्या वर्षाची फी 15 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 12 लाख 47 हजार रुपये इतकी होती.
आता हे सारं वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की शाहरुखने त्याच्या लेकीच्या शिक्षणासाठी नेमका किती खर्च केला?
एका रिपोर्टनुसार, सुहानाच्या कॉलेजच्या एका वर्षाच्या बोर्डिंगची फी प्रत्येक सेमिस्टरला 14 हजार पौंड इतकी आहे. म्हणजेच 14 लाख 51 हजार 177 रुपये इतकी होती.
टिश स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकण्यासाठी सुहानाने 63 लाखांच्या आसपास फी भरल्याचं सांगितलं जातं.
म्हणजेच शाहरुखने त्याच्या लेकीला शिकवण्यासाठी पावणेतीन ते तीन कोटी रुपयांच्या आसपास खर्च केला आहे.