देओल भावंड हे जवळपास 40 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. बॉबी, सनी, आहाना आणि इशा हे चारही सावत्र भावंडं एकत्र आले होते.
आता चर्चा सुरु आहे त्यांनी रक्षाबंधन कसं साजरं केलं या गोष्टीची.
एका मुलाखतीत इशानं खुलासा केला की 'लहान असताना आम्ही वडिलांना राखी बांधायचो. त्यामुळे मला वडील आणि भाऊ दोघांकडून गिफ्ट्स, पैसे मिळायचे.'
इशा म्हणाली, 'आता माझ्या भावांची संख्या जास्त झाली आहे. कारण, लग्नानंतर माझ्या आयुष्यात सासरच्या मंडळींची एन्ट्री झाली आहे.'
इशा म्हणाली की तिला ओवाळणीत मिळालेले पैस ती कधीच खर्च करत नाही.
दरम्यान, इशानं केलेल्या या वक्तव्यानंतर तिला सनी आणि बॉबीनं देखील पैसेच दिले असतील असं म्हटलं जातं आहे.
इशानं 'गदर 2' चं स्क्रिनिंग ठेवल्यानं हे चौघ एकत्र आले होते. तर हा चित्रपट लवकरच 500 कोटींचा आकडा पार करणार आहे. (All Photo Credit : Esha Deol Instagram/ Social Media)