संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी या वेबसिरीजची सर्वत्र चर्चा आहे. तवायफ या शिष्टाचाराची शिकवण देणारी शाळा मानली जायची. पण इंग्रजांनी त्यांना वेश्या आणि नर्तकांचा कलंक लावला. पण आजही भारतातील या 6 'तवायफ' ची नावं आदराने घेतात. त्यापैकी काहींवर चित्रपट तयार झाले आहेत.
गौहर जान या बनारसपासून कलकत्त्यापर्यंत प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आवाजाच्या जादूने त्यांना सन्मान मिळतो. डिक्स वर रिकॉर्ड केलेल पहिलं भारतीय गीत हे गौहर यांच्या आवाजातील आहे.
अवध की बेगम या नावाने प्रसिद्ध असलेले बेगम हजरत महल यांनी महाराणी यांच्या मान मिळाला होता. अवधचे नवाब वाजिद अली शाह यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं होतं.
जद्दनबाई ही तवायफ तिच्या आवाजाने लोक मंत्रमुग्ध व्हायचे. एवढंच नाही तर त्या प्रसिद्ध संगीतकार होत्या. जद्दनबाई या बॉलिवूड की प्रसिद्ध अभिनेत्री नगगिस दत्त यांची आई आहेत.
तवायफ जोहराबाई या भारतीय शास्त्रीय संगीतमधील प्रसिद्ध नाव आहे. उस्ताद शेर खान यांच्या तालीम खाली त्या तयार झाल्या होत्या.
तवायफ रसूलनबाई बनारसमधील प्रसिद्ध घराण्यातील गायिका होत्या. त्यांचा आवाज देशभरात गाजला होता. त्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं.
लखनऊ आणि कानपूरमधील प्रसिद्ध गायिका तवायफ अजिजुनबाई यांचं नाव मानाने घेतलं जातं. 1857 मधील भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या लढाईत त्यांचं योगदान होतं.