अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी त्यांचा मुंबईतील जुहूमधील 'प्रतिक्षा' बंगला मुलगी श्वेता नंदाला भेट म्हणून दिल्याची बातमी 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिली आहे.
'प्रतिक्षा' बंगला हा 17 हजार स्वेअर फुटांचा असून तो मुंबईमधील एक लोकप्रिय ठिकाण आहे. या बंगल्याची किंमत 50 कोटी रुपये इतकी आहे.
अमिताभ बच्चन यांनी 50.7 लाखांचे दोन भेट देण्यासंदर्भातील नोंदणी करार केले आहेत. या माध्यमातून त्यांनी 'प्रतिक्षा' बंगला मुलीच्या नावे केला.
1976 साली बच्चन कुटुंब 'प्रतिक्षा' बंगल्यात राहत होतं. या बंगल्याशी बच्चन कुटुंबाचं खास भावनिक नातं आहे. त्यामुळेच हा बंगला जया आणि अमिताभ यांनी लेकीला दिला आहे.
'प्रतिक्षा' बंगल्याबरोबरच अमिताभ यांचे 'जलसा' आणि 'जनक' असे 2 बंगले मुंबईमध्ये आहेत. यावरुनच त्यांचं मुंबईवरील प्रेम दिसून येतं.
जया बच्चन यांनी जुहूमधील 'प्रतिक्षा' बंगल्यामध्ये नव्याने काही मूलभूत बदल करुन घेतले होते. बदलत्या काळाबरोबर बदल करावा असं त्यांचं म्हणणं होतं.
'प्रतिक्षा' हे नाव बंगल्याला अमिताभ यांचे वडील हर्षवर्धन राय बच्चन यांनी दिलं होतं. हर्षवर्धन राय बच्चन यांच्या माध्यमातून या बंगल्याला साहित्यिक वारसा लाभलेला.
'प्रतिक्षा' बंगल्याची आजच्या प्रॉपर्टी रेटनुसार किंमत 50.63 कोटी इतकी आहे. अमिताभ आणि जया यांच्या या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे.