इशिता शुक्ला बनली 'महिला अग्निवीर'

खासदाराच्या मुलीने उंचावली नाव

भोजपुरी चित्रपटांचे सुपरस्टार आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार रवी किशन यांची मुलगी इशिता शुक्ला आता भारतीय लष्कराचा भाग होण्यासाठी सज्ज झाली आहे.

इशिता शुक्ला होणार अग्निवीर

इशिता शुक्लाने फिल्मी दुनियेऐवजी भारतीय सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तिने अग्निवीर योजनेंतर्गत नोंदणी केली

सैन्यात भरती होणार भाजप खासदाराची मुलगी

केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेअंतर्गत 21 वर्षीय इशिता सुरक्षा दलात सामील होणार आहे

इशिता ठरलीय सर्वोत्कृष्ट कॅडेट

2022 मध्ये, इशिताला NCC च्या ADG ने उत्कृष्टता पुरस्कार दिला होता. कर्नल राज्यवर्धन सिंग राठोर यांच्या हस्ते तिला सर्वोत्कृष्ट कॅडेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भाजप खासदारानेच दिली होती माहिती

गेल्या वर्षी अग्निपथ योजना लागू झाल्यानंतर रवी किशन यांनीच माझी मुलगी इशिता शुक्ला अग्निपथ योजनेप्रमाणे सैन्यात भरती होऊ इच्छिते असे सांगितले होते.

रवी किशन यांनी दिले आशिर्वाद

"माझी मुलगी इशिता शुक्ला, तिने आज सकाळी मला सांगितले की तिला अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात भरती व्हायचे आहे. मी तिला म्हणालो पुढे जा बेटा," असे रवी किशन यांनी म्हटलं होतं.

स्वतःचे स्वप्न पूर्ण करणार इशिता

रवि किशन यांची मुलगी इशिता शुक्ला तिचे स्वप्न पूर्ण करत सैन्यात भरती होणार आहे. (सर्व फोटो - @ishita_shukla9/instagram)

VIEW ALL

Read Next Story