अमृता खानविलकरने तिच्या ट्रिपचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिने या पोस्टमध्ये असे ही सांगितले आहे की ही ट्रिप तिच्यासाठी खूप भावनिक आणि कायम लक्षात राहणारी ठरली.
जपानची संस्कृती, तेथील पारंपरिक जेवण आणि लोकांचा शिस्तबद्ध स्वभाव यामुळे अमृताचे मन जपानने जिंकले आहे.
जपानची संस्कृती, तेथील पारंपरिक जेवण आणि लोकांचा शिस्तबद्ध स्वभाव यामुळे अमृताचे मन जपानने जिंकले आहे.
तिने तिचा प्रवास टोकियोच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून सुरू केला आणि स्थानिक पारंपरिक जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतला.
हा संपूर्ण प्रवास अमृतासाठी खूप हृदयस्पर्शी अनुभव ठरला.
'इथली स्वच्छता, लोकांची शिस्त आणि प्रत्येक गोष्टीतील बारकाईने मी प्रभावित झाले. इथे सगळंच मला खूप खोलवर जाणवलं,' असं अमृताने सांगितलं.
तिने पुढे असंही म्हटलं की, 'जपान हा देश मला एका वेगळ्याच दुनियेसारखा वाटला.'