'जवान' कोणत्या OTT वर आणि कधी होणार रिलीज?

तिकीटबारीवर खणखणीत कमाई

'जवान' चित्रपट सध्या तिकीटबारीवर खणखणीत कमाई करत आहे. शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट जगभरात गाजतोय.

जगभरात 600 कोटींहून अधिक कमाई

शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाने प्रदर्शनाच्या एका आठवड्यामध्येच जगभरात 600 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

मात्र 'जवान' चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार असा प्रश्न चाहत्यांना पडला असेल. तुम्हालाही हा प्रश्न पडला आहे का?

चाहत्यांमध्ये उत्सुकता

डिस्ने प्लस हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स किंवा इतर कोणत्या OTT वर 'जवान' पाहायला मिळणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

250 कोटी रुपयांना झाली OTT डील

'जवान' 250 कोटी रुपयांना एका ओटीटी प्लॅटफॉर्मने विकत घेतला आहे, अशी माहिती 'ओटीटी प्ले डॉट कॉम'ने दिली आहे.

'पठाण'ही अधिक रक्कम

शाहरुखच्याच 'पठाण'ची ओटीटी डील 100 कोटींना झालेली. त्यापेक्षा अधिक रक्कम 'जवान'साठी ओटीटी प्लॅटफॉर्मने मोजली आहे.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार 'जवान' चित्रपट?

मात्र तुम्ही 'जवान' चित्रपट थेअटरमध्ये पाहिला असेल तर तुम्हाला कल्पना असेलच की निर्मात्यांनी हा चित्रपट 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित होणार आहे.

स्ट्रिमींग पार्टनर

'जवान' चित्रपटाच्या क्रिडीट्समध्येच स्ट्रिमींग पार्टनर म्हणून 'नेटफ्लिक्स'चा उल्लेख आहे.

कधी होणार OTT वर रिलीज?

बॉलिवूड लाइफमधील वृत्तानुसार 'जवान' चित्रपट थेअरटरमध्ये रिलीज झाल्याच्या तारखेनंतर 40 ते 65 दिवसांमध्ये तो ओटीटीवर उपलब्ध होईल.

अधिकृत घोषणा नाही

मात्र 'जवान'च्या टीमने यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे औपचारिक घोषणेची वाट पाहणेच योग्य ठरेल. सध्या हा चित्रपट तिकीटबारीवर दणक्यात कमाई करत आहे.

VIEW ALL

Read Next Story