प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
सोशल मीडियावर देखील ती प्रचंड सक्रिय असते. नुकतीच अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे.
प्राजक्ताने 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील फोटो शेअर केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.
त्यासोबतच तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, गेली १३ वर्ष कला मनोरंजन क्षेत्रात काम करतेय.
या वर्षांमध्ये टीव्ही जगतात अनेक प्रोजेक्ट्स केले. पण 'जुळून येती रेशीमगाठी'वर प्रेक्षकांचं असणारं प्रेम काही वेगळच होते.
काल या मालिकेला 11 वर्ष झाली आहेत. 11 वर्षात इतर अनेक चित्रपट- मालिका येऊनही रेशीमगाठी कधी झाकोळली गेली नाही. असं तिने म्हटलं आहे.