फ्रान्समधील कान्स शहरात सुरू असलेल्या कान्स फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपल्या फॅशनने जलवा दाखवला आहे.
शर्मिला टागोर, उर्वशी रौतेला, जान्हवी कपूर यांच्यासह अनेक सेलेब्रिटींच्या यादीत आता करण जोहरचेही नाव जोडले गेले आहे.
करण जोहरने यंदा प्रथमच कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे.
त्याने नुकतेच कान्स फेस्टिव्हलमधील आपल्या लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
बॉलिवूडचा स्टाईल आयकॉन म्हणून ओळखला जाणारा करण आपल्या स्टायलिश लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पांढऱ्या रंगाच्या शाही पोशाखात करण अतिशय डॅशिंग दिसत होता.
त्याच्या ब्लेझरच्या कॉलर आणि कफवर केलेले हिरेजडीत डिझाईन विशेष लक्ष वेधून घेत होते.
पांढऱ्या शर्ट-ब्लेझर आणि काळ्या पँटसोबत घेतलेला ऑफ-व्हाईट दुपट्टा त्याच्या लूकमध्ये एका वेगळ्याच स्टाइलची भर घालत होता.