भावासोबत किसिंग सीन... करीनाने गमावला 'तो' सिनेमा

करीना कपूरला भावाच्या नात्यामुळे एक सिनेमा गमवावा लागला होता.

सिनेमाच्या स्क्रिप्टनुसार रणबीर कपूरसोबत तिला किसिंग सीन करावा लागणार होता.

इम्तियाज अलीच्या रॉकस्टार सिनेमातून रणबीर कपूर आणि नर्गिस फाकरी यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

रॉकस्टार सिनेमासाठी नर्गिस नव्हे तर करीना कपूर ही इम्तियाज यांची पसंत होती.

'जब वुई मेट'मधील करिनाचे काम आवडल्याने त्यांनी 'रॉकस्टार'साठी तिला कास्ट केले होते.

काकांचा मुलगा रणबीरसोबत तिला कास्ट करता येऊ शकत नव्हते. त्याला आधीच सिनेमासाठी साइन करण्यात आले होते.

यामुळे नर्गिसला ही भूमिका मिळाली. यानंतर करीना मात्र नाराज होती.

करिना खूप मेहनती आणि भावूक आहे. तिला इम्तियाजसहित अनेक दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे रणबीरने म्हटले आहे.

जे रोल रोमॅंटिक नसतील अशा सिनेमात एकत्र काम करायला नक्की आवडेल असे रणबीरने म्हटले होते.

रॉकस्टारमध्ये करीनाला घेतलं असतं तर त्यांना लिपलॉक सीन करावा लागला असता. जे शक्य नव्हतं.

रणबीर करीनासोबत काम करु शकला नाही पण त्याला आजोबा शम्मी कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती.

VIEW ALL

Read Next Story