'भूल भुलैया 3' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी येत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन पुन्हा एकदा 'रूह बाबा' बनणार असून एक भयानक केस तो सोडवताना दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने 'भूल भुलैया 3' या चित्रपटासंबधित महत्त्वाची माहिती चाहत्यांसाठी शेअर केली आहे.

कार्तिकने सोशल मीडियावर 'भूल भुलैया'च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील 'मेरे ढोलना सुन' हे गाणे शेअर केले आहे

हे गाणं शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, 'आणि हे होत आहे... खरी मंजुलिका भूल भुलैयाच्या जगात परत येत आहे, Super thrilled to welcome. या दिवाळीत भूल भुलैया ३चे फटाके फुटतील.

भूल भुलैया 2 हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला होता, ज्याने 100 कोटींहून अधिकचा बिझनेस केला होता. तो चित्रपट अनीस बज्मीने दिग्दर्शित केला होता ज्यात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसले होते.

याआधी 2007 मध्ये प्रियदर्शन दिग्दर्शित 'भूल भुलैया' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसला होता.

2024 च्या दिवाळीला प्रदर्शित होणाऱ्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटात कार्तिक आर्यन, विद्या बालन, राजपाल यादव, कियारा अडवाणी सारखे स्टार्स दिसणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story