कार्तिक-अनन्याचा ताजमहालात रोमँटिक अंदाज; कार्तिक म्हणतोय, 'मुमताज कुठे आहे?'

Intern
Jul 30,2025


कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे सध्या 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' या रोमँटिक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.


या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर विद्वंस करत असून, प्रेक्षकांना याची उत्सुकता लागली आहे.


अलीकडेच चित्रपटाच्या शुटींगसाठी संपूर्ण टीम आग्रा येथे दाखल झाली आहे.


आग्र्यात पोहोचताच कार्तिक आणि अनन्याने ताजमहालाला भेट देऊन खास फोटोज काढले आहेत.


ताजमहाल परिसरातून कार्तिकने फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं- 'ताज बांधला गेला आहे... मी मुमताज शोधतोय.'


त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सद्वारे मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.


दुसरीकडे, अनन्या पांडेही ताजमहालातील क्षणांचा आनंद घेताना साध्या लूकमध्ये दिसली.


अनन्यानेही ताजमहालाचे फोटो शेअर करत 'व्वा ताज!' असे कॅप्शन दिले.


हा चित्रपट 13 फेब्रुवारी 2026 रोजी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

VIEW ALL

Read Next Story