सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम कार्तिकी गायकवाडच्या मुलाचा आज पहिला वाढदिवस आहे.
यानिमित्ताने कार्तिकीने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
२०२० मध्ये कार्तिकीने रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली.
गेल्यावर्षी तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं.
आज कार्तिकीच्या लाडक्या लेकाचा पहिला वाढदिवस आहे.
कार्तिकीने रिशांक या आपल्या बाळाचे फोटो शेअर केले आहेत.
Introducing ‘रिशांक कार्तिकी रोनित पिसे’ असं कॅप्शन देत कार्तिकीने तिच्या लेकाचं नाव जाहीर केलं.
रिशांकला कार्तिकेने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
कार्तिकीच्या आयुष्यातील खास क्षण शेअर केला आहे.