कतरिना कैफ ही लोकप्रिय अभिनेत्री असून आज तिचा 40 वा वाढदिवस आहे.
कतरिनानं तिच्या वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
कतरिना फिटनेस फ्रीक आहे. ती नियमितपणे व्यायाम करते, बिझी शेड्युल्ड असूनही ती कधीही वर्कआउट मिस करत नाही.
कतरिना ही काटेकोरपणे डाएट फॉलो करते. अनेक मुलाखतींमध्ये तिने तिच्या फिटनेसचे रहस्य उघडपणे सांगितले आहे.
कतरिना तिच्या दिवसाची सुरुवात चार ग्लास कोमट पाणी पिऊन करते.
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी कतरिना केवळ जिममध्येच व्यायाम करत नाही तर फिटनेससाठी पिलाटेस, योगा, सायकलिंग, वेट ट्रेनिंग आणि डांस प्रॅक्टिसही करत असते. याशिवाय अभिनेत्री कार्डियो, केटलबेल्स, पावरप्लेटसारखे बरेच व्यायाम करते.
कतरिना तिच्या डायटमध्ये सगळ्यात जास्त वाफवलेल्या भाज्यांचा समावेश होतो.
दर दोन तासांनी एक फळ खाते. नाश्त्यात कतरिना दलिया, एग व्हाइट खाते.
दुपारच्या जेवणात कतरिना डाळ भात आणि सलाड खाते. तर डिनरमध्ये कतरिना कैफ सूप, उकळलेल्या भाज्या आणि सलाड खाते. (All Photo Credit : Katrina Kaif Instagram)