'द मोझार्ट ऑफ मद्रास' म्हणून प्रसिद्ध असलेले एआर रहमान हे भारतातील सर्वात श्रीमंत गायक आणि संगीतकार आहेत. 57 वर्षीय रहमानने केवळ हिंदीतच नाही तर तमिळसह इतर भाषांमध्येही मधुर गाणी गाऊन लोकांना त्याच्या आवाजाचे वेड लावले आहे.

Jan 06,2024


रेहमानचे लहानपणी कॉम्प्युटर इंजिनिअर बनण्याचे स्वप्न होते. पण वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही आणि फी भरू न शकल्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली.


ए.आर. रेहमान अवघ्या 9 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडील गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली.


रेहमान यांचे वडील देखील संगीतकार होते आणि त्यांनी मल्याळम चित्रपटांसाठी संगीत दिले होते. त्यामुळे त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षी पियानो शिकण्यास सुरुवात केली


हळूहळू त्याच्या कामाची लोकांना ओळख झाली आणि लवकरच त्यांना चित्रपटांमध्येही काम मिळू लागले. जीवनात अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर आज तो चांगले जीवन जगत आहे.


ए.आर. रेहमान एका गाण्यासाठी करोडो रुपये घेतो. तर लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तो एका तासाच्या परफॉर्मन्ससाठी 1 ते 2 कोटी रुपये एवढी मोठी फी घेतो. त्यांची एकूण संपत्ती 1748 कोटी रुपये आहे.


ए आर रेहमान सध्या मुंबई इथे एका आलिशान घरात राहतो. 2001 मध्ये त्याने हे आलिशान घर घेतले होते. या प्रॉपर्टीची किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. (सर्व फोटो - @arrahman/instagram)

VIEW ALL

Read Next Story