बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या डेटिंगच्या अफवांमुळे चर्चेत आहे. तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेले व्हेकेशनचे फोटोज प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यामुळे या चर्चांना आणखी जोर मिळाला आहे.
क्रिती सध्या यूकेतील कोट्याधीश उद्योगपती कबीर बाहियाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघांना एकत्र बाहेर फिरताना अनेकदा पाहिले गेले आहे.
क्रिती सध्या लंडनमध्ये असून, तिने तिथले काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे.
या व्हेकेशनदरम्यान कबीर बाहियाने देखील आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले, ज्यात तो मित्रांसोबत वेळ घालवत असल्याचे दिसते.
त्याच फोटोंपैकी एका फोटोमध्ये दोन जणांची सावली स्पष्टपणे दिसते. ज्यामुळे नेटकऱ्यांनी अंदाज लावला की ही सावली क्रिती आणि कबीरचीच आहे.
ही सावली पाहून चाहते उत्सुकतेने कमेंट करत आहेत. काही जण क्रितीला 'भाग्यवान' म्हणत आहेत, तर काही कबीरला थेट विचारत आहेत, 'लग्न केव्हा करणार?'
या फोटोंमुळे क्रिती सेनन आणि कबीर बाहियाचे नाते अधिकच स्पष्ट झाले आहे. या दोघांनी अजूनही त्यांच्या नात्याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.