सगळ्यांना खळखळू हसवणारा 'मडगाव एक्सप्रेस' ओटीटीवर प्रदर्शित

हिरामंडी सारख्या वास्तवदर्शी सिनेमानंतर आता पोट धरुन हसायला लावणारा मडगाव एक्सप्रेस शुक्रवारी ओटीटीवर रिलीज झाला आहे.

बॉलिवू़डचा चॉकलेट बॉय असलेला अभिनेता कुणाल खेमू मडगाव एक्सप्रेस या सिनेमातून दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मडगाव एक्सप्रेसचं कथानक बालपणीच्या तीन मित्रांभोवती आहे. ज्यांचं गोव्याला फिरायला जाण्याचं स्वप्नं असतं.

हे स्वप्न जेव्हा सत्यात येतं, तेव्हा प्रवासात असं काही होतं की त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता.

मडगाव एक्सप्रेस मधला हा तीन मित्रांचा प्रवास प्रेक्षकांचा पैसा वसूल करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

दिव्येंदू, प्रतीक गांधी आणि अविनाश तिवारी हे प्रमुख भूमिकेत आहेत तर नोरा फतेही, उपेंद्र लिमये आणि छाया कदम अशी स्टारकास्ट आहे.

रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर निर्मित मडगाव एक्सप्रेसला प्रेक्षकांकडून काय प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIEW ALL

Read Next Story