'महाभारत'मधील शकुनीमामा आठवतात का?

बी आर चोप्रा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या 'महाभारत' मालिकेत शकुनीमामाची भूमिका निभावणारे शकुनीमामा तुम्हाला आजही आठवत असतील.

गुफी पेंटल शकुनीमामामुळे प्रसिद्ध

गुफी पेंटल यांनी शकुनीमामाची भूमिका निभावली होती. ज्यासाठी त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. त्यांचं नाव घराघरात पोहोचलं होतं.

लंगडत भूमिकेचं वैशिष्ट्य

गुफी पेंटल यांनी भूमिकेला अगदी योग्य न्याय दिला होता. यावेळी त्यांचं लंगडत चालणं हे या भूमिकेचं वैशिष्ट्य होतं.

गुफी पेंटल यांना करावा लागला संघर्ष

सुरुवातीला गुफी पेंटल यांना लंगडत चालताना फार त्रास व्हायचा. मात्र नंतर त्यांना याची सवयच लागली होती.

शकुनीमामा लंगडत का चालायचा?

पण शकुनीमामाची भूमिका निभावणारे गुफी पेंटल लंगडत का चालायचे हे तुम्हाला माहिती आहे का? यामागे गुफी पेंटलच कारणीभूत होते.

गुफी पेंटल यांनाच सुचली होती कल्पना

त्यांनीच बीआर चोप्रा आणि राही मासूम रजा यांना लंगडत चालण्याची कल्पना दिली होती. तसंच यामागील कारणही सांगितलं होतं.

आजोबा ठरले होते कारण

गुफी पेंटल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांचे आजोबा सांगायचे जो माणूस वाईट असतो त्याला देव शारिरीक दोष देतो.

गुफी पेंटल यांचं म्हणणं खरं ठरलं

"अशा स्थितीत शकुनीमामा निगेटिव्ह भूमिकेत असल्याने लंगडत चालणं त्याला एक वेगळी ओळख देत होते, जे नंतर योग्यही सिद्ध झालं".

खरं नाव सरबजीत सिंह पेंटल

गुफी पेंटल यांचं खर नाव सरबजीत सिंह पेंटल होता. 4 ऑक्टोबर 1944 रोजी पंजाबमध्ये त्यांचा जन्म झाला होता.

शकुनीमामा सर्वोत्तम भूमिका

गुफी पेंटल अभिनेता आणि दिग्दर्शक होते. 'महाभारत'मधील शकुनीमामा ही त्यांची सर्वोत्तम भूमिका ठरली.

5 जूनला निधन

5 जूनला गुफी पेंटल यांचं निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

VIEW ALL

Read Next Story