या फोटोत अभिनेत्रीसोबत बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही दिसत होता. अभिनेत्रीने हा फोटो शेअर करताच सर्वत्र तिच्या लूकची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

या लूकमध्ये मलायका अरोरा पांढऱ्या रंगाच्या शर्टसोबत शॉर्ट स्कर्ट परिधान केला आहे.

अभिनेत्रीचा हा शर्ट इतका एक्सपोजर आहे की, तिचे हे फोटो पाहून तिला युजर्स चांगलंच ट्रोल करत आहेत.

तिचा हा लूक पूर्ण करण्यासाठी मलायका अरोराने टाइट बन आणि डायमंड कानातले घातलेले दिसत आहेत.

हे फोटो शेअर करत मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'हे तुमच्यासाठी आहे अरहान खान. फॉरेव्हर फेवरेट. या सुंदर संध्याकाळसाठी सोनम कपूर आणि आनंद आहुजा थँक्यू

हे फोटो शेअर करताच ट्रोलर्सनी मलायकाला ट्रोल करायला सुरुवात केली. एकाने ट्रोल करत लिहिलं की, काहीतरी लाज वाटू दे. तर दुसर्‍याने लिहिलं, काय घातलं आहे तिने? थोडीतरी लाज वाटू दे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत. मात्र, मधल्या काळात हे दोघांचं ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या होत्या.

सोनम कपूरच्या पार्टीत दोन्ही स्टार्स एकत्र दिसल्यानंतर ही बातमी अफवा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं.

VIEW ALL

Read Next Story