'The Family Man' मध्ये Manoj Bajpayee ऐवजी दिसला असता 'हा' अभिनेता

मनोज बाजपेयी सध्या चर्चेत असण्याचं हे आहे कारण

मनोज बाजपेयी 'सिर्फ एक बंदा काफी है' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

मनोज यांच्या आजवरच्या आवडत्या भूमिका कोणत्या

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनोज बाजपेयी त्यांनी सांगितले की त्यांच्यासाठी कोणतेही पात्र निवडणे कठीण आहे.

‘द फॅमिली मॅन’ साठी मनोज यांनी त्यांची पत्नी शबानानं दिली होती अशी प्रतिक्रिया

मनोज शबानानं दिलेल्या सल्ल्याविषयी बोलताना, म्हणाले "ही वेब सिरीज माझी पत्नी शबानासाठी समस्या ठरली होती. तिला वाटलं की मी कुठलीतरी सीरियल करत आहे. तिला ओटीटीबाबतही काहीच माहिती नव्हती."

मनोज यांची पत्नी शबानानं दिला होता हा सल्ला

"ओटीटी आणि मालिकांमधील फरक सांगितला तेव्हा तिनं मला ही वेबसीरिज न करण्याचा सल्ला दिला होता. शबाना म्हणाली होती, आपल्याला पैशांची काय गरज आहे? सगळं काही छान चाललं असताना तू तुझं करिअर का खराब करत आहेस?", असं मनोज यांनी सांगितलं.

ओटीटीमधून किती यश मिळत याविषयी शबाना यांनी कधी कळलं

'द फॅमिली मॅन' प्रदर्शित झाल्यनंतर शबाना यांना ओटीटीमध्ये किती ताकद आहे त्यामुळे किती यश मिळत हे कळलं.

सीरिजमध्ये या कारणासाठी मनोज यांना करायचे नव्हते काम?

सीरिज म्हणजे सेक्स, व्हायलंस आणि थ्रिल यावर असतात असं त्यांना वाटत होतं.

मनोज आधी हा अभिनेता करणार होता या सीरिजमध्ये काम

मनोज यांच्या आधी अक्षय खन्ना ही सीरिज करणार होता. मनोज यांना जेव्हा हे कळाले तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना दुसऱ्या कलाकाराचं काम करायला आवडत नाही.

या व्यक्तीमुळे मनोज यांनी दिला सीरिजला होकार

मुकेश छाबडा यांनी मनोज यांना मनवण्याचा प्रयत्न केला अशात त्यांनी या सीरिजची स्क्रिप्ट मनोज यांना ऐकवली आणि त्यांनी लगेच सीरिजसाठी होकार दिला.

लवकरच येणार सीरिजचा 3 भाग

मनोज यांच्या या लोकप्रिय सीरिजचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story