मराठमोळ्या अभिनेत्याचं सपत्नीक अमृतस्नान; महाकुंभमधील हे फोटो पाहाच

Published by: Sayali Patil | Jan 30, 2025

अध्यात्मिक सोहळा

Mahakumbh 2025 : साऱ्या जगातील सर्वात मोठा धार्मिक, अध्यात्मिक सोहळा अशी ओळख असणारा महाकुंभ मेळा प्रयागराज इथं सुरु असून, इथं कोट्यवधी भाविकांनी हजेरी लावली आहे.

Published by: Sayali Patil | Jan 30, 2025

प्रयागराज

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं पार पडणाऱ्या या सोहळ्यामध्ये साधुसंतांची गर्दी आहेत, शिवाय इथं गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी भाविकही गर्दी करताना दिसत आहेत.

Published by: Sayali Patil | Jan 30, 2025

कलाविश्व

मराठी कलाविश्व गाजवत आपली वेगळी अशी ओळख निर्माण करणारी एक लोकप्रिय जोडीसुद्धा तिथं पोहोचली.

Published by: Sayali Patil | Jan 30, 2025

प्रवीण तरडे

ही जोडी म्हणजे अभनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका स्नेहल तरडे.

Published by: Sayali Patil | Jan 30, 2025

केशरी वस्त्र

केशरी वस्त्र गळ्यात रुद्राक्षांची माळ अशा एकंदर रुपात ही जोडी त्रिवेणी संगम इथं पोहोचली. त्यांनी तिथं गंगेचं विधीवत पूजन केलं आणि या अमृततुल्य पाण्यत स्नानही केलं.

Published by: Sayali Patil | Jan 30, 2025

गंगास्नान

मौनी अमावस्येच्या निमित्तानं तरडे दाम्पत्यानं हे गंगास्नान केलं आणि या खास क्षणांची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आणली.

Published by: Sayali Patil | Jan 30, 2025

भाविकांचा उत्साह

प्रयागराज येथील वातावरण, तिथं आलेल्या कोट्यवधी भाविकांचा उत्साह आणि अध्यात्माचं एक वेगळं रुप या साऱ्याचं वर्णन त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं.

Published by: Sayali Patil | Jan 30, 2025

गर्दी

बुधवारपर्यंत महाकुंभ मेळ्यात तब्बल 20 कोटी भाविकांनी हजेरी लावली आणि अद्यापही इथं भाविकांचा ओघ वाढतच चालला आहे.

Published by: Sayali Patil | Jan 30, 2025

VIEW ALL

Read Next Story