शरद पोंक्षेंची लेक झाली पायलट

मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी पोंक्षे पायलट झाली आहे. शरद पोंक्षे यांनी ट्विटरला एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

"सिद्धी शरद पोंक्षे आज पायलट झाली. इयत्ता ४ पासून तिने पाहिलेलं स्वप्न पुर्ण झालं"

"खडतर परीस्थितीवर मात"

"अत्यंत खडतर परीस्थितीतून, माझं आजारपण, कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत. बॅकेचं कर्ज काढून, कोणतीही सवलत, आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुद्धिमत्ता, परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली"

"बापाला आणखी काय हवं"

"बापाला आणखी काय हव नाही का?आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तुझा सिद्धी. मोठी हो पुढे देशाची सेवा कर.उत्तम सेवा दे. करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा".

बारावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण

शरद पोंक्षे यांना कर्करोगाचं निदान झालेलं असतानाही त्या परिस्थितीत सिद्धीने अभ्यास करत बारावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण मिळवले होते.

गेल्या दीड वर्षांपासून अमेरिकेत

यानंतर ती उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली होती. सिद्धी गेल्या दीड वर्षांपासून अमेरिकेतील एका वैमानिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकत होती.

‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’

शरद पोंक्षे यांनी मुंबई विमानतळावरचा लेकीसोबत फोटो शेअर केला होता. ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असं त्यांनी म्हटलं होतं.

VIEW ALL

Read Next Story