मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.
अशातच आता तिने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलं असून ते फोटो शेअर केले आहेत.
तिने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो खूप व्हायरल झाले आहेत.
तिचा यंदाचा दिवाळीचा नवीन लुक चर्चेचा विषय ठरला आहे. ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.
या फोटोमध्ये प्राजक्ता माळी खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक दिवाळीसाठी खूपच खास आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी तिच्या सौंदर्यासोबत अभिनयामुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
तिच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.